वसईच्या अप्पर तहसीलदारानी मागितली 40 लाखाची लाच - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Tuesday, 21 April 2026

वसईच्या अप्पर तहसीलदारानी मागितली 40 लाखाची लाच

 


वसईच्या अप्पर तहसिलदारांनी मागितली ४० लाखांची लाच

खासगी इसमास ७ लाख घेतांना रंगेहाथ अटक


वसई


जागेला अकृषिक मान्यता देण्यासाठी तसेच अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी वसईच्या अपर तहसिलदारांनी तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा लावून अपर तहसिलदारांचा खासगी इसमाला ७ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी अपर तहसिलदार विनोद धोत्रे फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


तक्रारदार यांची वस‌ई पुर्वेच्या मधुबन परीसरात दोन एकर जागा आहे. यातील काही जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. वसई तहसिलदार कार्यालयात वावरणारा खासगी इसम अनिल चौबळ याने अपर तहसिलदार विनोद धोत्रे याच्या वतीने तक्रारदारास संपर्क केला. या अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये यासाठी १० लाख तसेच संबंधित जागा अकृषीक करण्यासाठी ४० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी ७ लाख रुपये लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने याप्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार वसई तहसिलदार कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. खासगी इसम अनिल चौबळ याला ७ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याची कुणकूण लागताच अपर तहसिलदार विनोद धोत्रे हा पसार झाला. या दोघांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Home Admin Contact About
Home Admin Contact About