वसई-विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग
दि.११/१२/२०२५
*आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजित मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम व इतर अनुषंगिक बाबींची मा.आयुक्त महोदयांनी केली पाहणी*
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी गुरुवार दि.११ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित मतमोजणी केंद्र तसेच स्ट्रॉंग रूम व इतर अनुषंगिक बाबींची पाहणी केली.
महानगरपालीकेची आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, कोणत्याही प्रकारची अडचण निवडणूक प्रक्रियेत निर्माण होऊ नये या निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर तसेच तळमजल्यावरील जागांची पाहणी करून सदर ठिकाणी नियोजित असलेल्या मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम, तेथे करावयाची सुरक्षा व्यवस्था, अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवार-प्रतिनिधी यांची बैठक व्यवस्था व इतर आवश्यक त्या सर्व बाबींविषयी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याशी सविस्तर चर्चा मा.आयुक्त महोदयांनी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी वेळी मा.अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) श्री.संजय हेरवाडे, मा.अतिरिक्त आयुक्त (उत्तर) श्री.दिपक सावंत, उप-आयुक्त श्रीम.स्वाती देशपांडे, प्र.शहर अभियंता श्री.प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता श्री.संजय कुलकर्णी, प्र.कार्यकारी अभियंता श्री.सुरेंद्र ठाकरे, प्र.कार्यकारी अभियंता श्री.अमोल जाधव, उप-अभियंता श्री.सतीशकुमार सूर्यवंशी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका

