जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिनांक ०४ डिसेंबर रोजी महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Tuesday, 2 December 2025

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिनांक ०४ डिसेंबर रोजी महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 


वसई-विरार शहर महानगरपालिका 

दिव्यांग कल्याण विभाग                                                     दि.०२/१२/२०२५    

 

*“जागतिक दिव्यांग दिनाच्या” निमित्ताने दि.०४ डिसेंबर रोजी महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन*  

दि.०३ डिसेंबर हा दिवस “जागतिक दिव्यांग दिन” म्हणून साजरा केला जातो. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत दि.०४ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात “जागतिक दिव्यांग दिन” साजरा करण्यात येणार आहे. 

         दिव्यांग नागरिकांसाठी वसई विरार महानगरपालिकेमार्फत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. महानगरपालिकेमार्फत *गुरुवार दि.०४ डिसेंबर २०२५* रोजी *दुपारी ०१.४५* वाजता *वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, वाहनतळ, विरार (प.)* येथे “जागतिक दिव्यांग दिन” साजरा केला जाणार असून दिव्यांगांसाठी यावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

    

                                                                             दिव्यांग कल्याण विभाग  

वसई विरार शहर महानगरपालिका

Home Admin Contact About
Home Admin Contact About