वसई विरार शहर महानगरपालिका
दिव्यांग कल्याण विभाग
दि.२१/११/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन;*
*लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन*
दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करुन देणे हे समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक दिव्यांग युवक/युवती शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि काम करण्याची क्षमता असूनही केवळ दिव्यांगत्व असल्यामुळे व योग्य मार्गदर्शन व रोजगार संधीच्या अभावामुळे रोजगारापासून वंचीत राहतात, या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांकरिता *"दिव्यांग रोजगार मेळावा"* सोमवार, *दि.२४/११/२०२५* रोजी *सकाळी ०९.३०* वाजता, *वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, दुसरा मजला, वाहनतळ, विरार (प.)* येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांनी या दिव्यांग रोजगार मेळाव्यांस उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
