सेवा पंधरवड्यातून जिल्हा प्रशासनाचा विकासाचा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Tuesday, 14 October 2025

सेवा पंधरवड्यातून जिल्हा प्रशासनाचा विकासाचा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड


 *सेवा पंधरवड्यातून जिल्हा प्रशासनाचा विकासाचा संकल्प*


*पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतून जिल्हा विकासाला गती*


*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*


पालघर, दि. १४ ऑक्टोबर : सेवा पंधरवडा” (दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५) हा केवळ उपक्रम नसून, प्रशासनाने नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडविण्याचा विकासाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत केले.

 जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रणजीत देसाई उपस्थित होते.

या पंधरवड्यात ‘पाणंद रस्ते’, ‘सर्वांसाठी घरे’ आणि ‘नाविन्यपूर्ण उपक्रम’ अशा विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून पालघर जिल्हा प्रशासनाने जनसहभागातून विकासाचे नवे पर्व सुरू केले.

दि. १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणंद रस्ते मोहिमेत ५६९२ रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ४०५० रस्ते नकाशावर नव्याने शोधण्यात आले, तर ८१ रस्त्यांवरील अतिक्रमणे (३६.२ कि.मी.) हटविण्यात आली ४८३ रस्त्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून २०८० रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक देण्यात आले आहेत.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शिवारापर्यंत कायदेशीर, कायमस्वरूपी मार्ग मिळाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.


दि. २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये २३६ अतिक्रमणे नियमबद्ध करून २.७५७९ हेक्टर क्षेत्र नागरिकांना कायदेशीर मालकीहक्काने देण्यात आले. २३६ घरकुल धारकांना अधिकृत स्वामित्व हक्क मिळाल्याने “प्रत्येक कुटुंबासाठी आपले घर” या स्वप्नाची पूर्तता झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

      नागरिकांना शासनाच्या सेवांचा लाभ घरपोच मिळावा यासाठी ‘सेवादूत’ ॲप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिक अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकतात.

मोहिमेदरम्यान १९१३ अर्ज प्राप्त, त्यापैकी ७६१ अर्ज मंजूर करण्यात आले.

तसेच ६४१ “आपले सरकार सेवा केंद्रांचे” परीक्षण करून उत्कृष्ट केंद्रांना गौरवचिन्हे प्रदान करण्यात आली.


 शाळा तिथे दाखला’ उपक्रमाअंतर्गत 

जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ६९५ शाळांमध्ये दाखल्यांसाठी शिबिरे घेण्यात आली.

एकूण ८०,७३० दाखल्यांपैकी ४९,२१६ दाखले वितरीत झाले असून हे दाखले DigiLocker प्रणालीशी जोडलेले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

   जिल्ह्यातील ३४५ दावे मंजूर, तर १३१९ दावे फेरतपासणीसाठी पाठविले.

७५९.५५ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड आणि GIS आधारित पडताळणी करण्यात आली.

   AI–Blockchain  या प्रणालीत सर्व जमीनसंपादन नोंदी ब्लॉकचेनवर अपरिवर्तनीय स्वरूपात सुरक्षित साठवल्या जातात. बुलेट ट्रेन, विरार–डहाणू चौपदरीकरण यांसारख्या प्रकल्पांची माहिती नागरिकांना ऑनलाइन व पारदर्शकपणे मिळणार आहे.

जिल्ह्यातील ५० कोळीवाड्यांचे GIS सर्वेक्षण पूर्ण होत असून, सातपाटी गावात प्रायोगिक अंमलबजावणी सुरू आहे.

लवकरच सर्व कोळीवाड्यांना डिजिटल मिळकत पत्रिका देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले 

  या सर्व उपक्रमांमधून शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारी पोहोचल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कार्यपद्धती आणि नागरिकांचा सहभाग यावर आधारित हा पंधरवडा जिल्हा विकासाचा नवा टप्पा ठरल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

   शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणे सेवा पंधरवड्याचा उद्देश असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.