*मदरसामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत*
राज्यातील काही जिल्हयांतील आश्रम शाळांमध्ये गोवर उद्रेक दिसुन आला आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व अनुदानित/विना अनुदानित आश्रमशाळांमध्ये *गोवर रुबेला लसीकरण मोहिम* दिनांक *१५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेबर २०२५* या कालावधीमध्ये राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मदरसामध्ये राहत असलेल्या बालकांना गोवर रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देऊन वरील कालावधीमध्ये वेळ *सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० पर्यंत* या दरम्यान त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेअंतर्गत खालील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व मदरसामध्ये लसीकरण राबविण्यात येत आहे.
*आरोग्य संस्थेचे नाव*
१)नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेडकरनगर
२)नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरेगाव
३)नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बऱ्हामपूर
*मदरसा नाव*
१)अन्सारी नगर, नालासोपारा (पुर्व)
२)90 फिट रोड ओसवाल नगर, नालासोपारा (पुर्व)
३)दुधवाला चिल्ड्रन्स वेलफेअर होम, वसई (पश्चिम)