महिला लोकशाही दिन 15 सप्टेंबर रोजी - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Friday, 12 September 2025

महिला लोकशाही दिन 15 सप्टेंबर रोजी

 


महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी


पालघर दि. १२  : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,  येथे आयोजित करण्यात आला आहे.

महिला लोकशाही दिनाचा अर्ज जिल्हाधिकारी यांना उद्देशून असावा. तसेच तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र. व तहसिलदारांच्या उत्तराची प्रत अर्जा सोबत जोडण्यात यावी. महिला लोकशाही दिनी घ्यावयाची तक्रार, अडचण सोडविण्यासाठी  अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कक्ष क्र. १०८, पहिला मजला, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोळगाव रोड, पालघर येथे करावा.

संपर्कासाठी ई-मेल- dwcdopalghar@gmail.com दूरध्वनी क्र . ०२५२५-२५७६२२ यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुरव्यासह सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,  यांनी केले आहे.

*******