कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Tuesday, 9 September 2025

कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन


 *कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन*

-

*पत्रकारांनी शासनाच्या योजना, प्रकल्पांची सकारात्मक प्रसिध्दीव्दारे* 

*जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे.*  

*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड* 

पालघर, (जिमाका) दि. 09:- पालघर जिल्हयात केंद्र आणि राज्य शासनाव्दारे विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्हयासह देशाचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे. या विकास प्रकल्पांबाबत सकारात्मक प्रसिध्दी करुन जिल्हयाच्या सर्वांगिण विकासात महात्वाचे योगदान द्यावे. असे भावनिक आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी  आज येथे केले. 

मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पणकरुन कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.  

कोकण विभागीय माहिती कार्यालय, पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हयातील पत्रकारांसाठी आज पालघर जिल्हा परिषदेच्या दूसऱ्या मजल्यावरील जननायक बिरसा मुंडा सभागृह दालन क्र. 212 येथे “आधुनिक पत्रकारिता कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. या एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड बोलत होत्या.  

या कार्यशाळेस जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला,  विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य हर्षद पाटील, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव, कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी श्रध्दा घरत तसेच या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून  समाज माध्यम आणि कृत्रिम बुध्दीमता (AI) या विषयातील तज्ञ युवराज आर्य, सायबर गुन्हे तज्ञ उन्मेश जोशी, डिजीटल मिडियातील तज्ञ संजय मिश्रा आणि पालघर जिल्हयातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या अध्यक्षांसह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. 

पत्रकारांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड म्हणाल्या की, बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारणे ही काळाची गरज आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेचे रुप बदलले आहे. समाज माध्यमांमध्ये नफ्यासह तोटेही आहेत. समाज माध्यमे हाताळतांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात.

पालघर जिल्हयाच्या विकसकामांबाबत माहिती देत जिल्हाधिकारी डॉ.जाखड म्हणाल्या की, पालघर जिल्हयात केंद्र आणि राज्य शासानाव्दारे विविध मोठे विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पुढील पाच वर्षात पालघर जिल्हयाचे स्वरुप बदलणार आहे. सर्व दिशांनी पालघर जिल्हयासाठी विकासाचे मार्ग मोकळे होत आहेत. यामुळे मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. विकास प्रकल्पांबाबत पत्रकारांनी सकारात्मक प्रसिध्दी करुन जिल्हयाच्या सर्वांगिण विकासात महत्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी या कार्यशाळेच्या मध्यमातून जिल्हयातील सर्व पत्रकारांना केले. जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी यावेळी जिल्हयातील पत्रकारांसाठी असे महत्वाचे विषय घेऊन कार्यशाळा आयोजित केल्या बद्दल माहिती व जनसंपर्क विभागाचे विशेष कौतुक केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले की, “पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. समाज माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पत्रकारितेला नवा वेग व आकार देत आहेत. प्रिंट मिडिया, डिजिटल मिडिया सोबत समाज मध्यमे आणि कृत्रिम बुध्दीमता (AI) देखील दैनंदिन जीवनाचा भाग होत आहेत. प्रशासनाची चूक दाखविणे ही पत्रकारांची जबाबदारी आहेच; पण प्रशासन चांगले काम करीत असल्यास त्याचेही कौतुक व्हायला हवे.” त्यांनी जलजीवन मिशन, प्रधानमंत्री घरकुल योजना अशा विविध विकास योजनांची माहिती देऊन पत्रकारांनी बांधिलकीने सहकार्य करावे, असे आवाहन केले.

कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती समितीची कार्यपद्धती, महत्त्व आणि पत्रकारांसाठी अधिस्वीकृतीपत्रिकेचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. पत्रकारांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य केल्यास जिल्ह्यासह राष्ट्राच्या विकासाला हातभार लागतो,” असे ते म्हणाले. पालघर जिल्हयातील पत्रकारांनी अधिस्वीकृतीपत्रिकेबाबत माहिती जाणूनघेऊन शासनाच्या नियमावली प्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करुन अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी श्री. जालनावाला यांनी केले. 

दुसऱ्या सत्रात समाज माध्यम आणि कृत्रिमबुध्दीमता या विषयातील तज्ञ युवराज आर्य आधुनिक पत्रकारितेत एआय व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करता येतो, माहिती संकलन व प्रसारण प्रक्रियेत त्याचे महत्त्व आणि पत्रकारांनी यातून कोणती दक्षता घ्यावी.  याविषयी सविस्तर सादरीकरण केले.  सायबर गुन्हे तज्ञ उन्मेश जोशी यांनी सायबर गुन्हे – वेलनेस आणि आपण या विषयावर माहिती देताना इंटरनेटचा वापर करून होणारी आर्थिक फसवणूक, ऑनलाईन फसवेगिरीची युक्ती, तसेच अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन केले. त्यांनी सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला.  डिजिटल मिडिया तज्ञ संजय मिश्रा यांनी पत्रकारिता करताना समाज माध्यम व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून डिजिटल मिडिया प्रभावीपणे हाताळण्याचे महत्त्व स्पष्ट केले. पत्रकारितेत डिजिटल साधनांचा योग्य व जबाबदार वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी प्रास्ताविक केले. सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी कुशल सूत्रसंचलन केले. विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, जिल्हा माहिती कार्यालय, पालघर आणि ठाणे, जिल्हा परिषद पालघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ही कार्यशाळा यशस्वी करण्यास विशेष सहकार्य लाभले.