*" वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांची वसईतील रस्ते , उड्डाणपूल आणि रेल्वे ब्रीजच्या कामांसाठी मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत पुन्हा चर्चा "*
वसईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्द असलेल्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतील महत्वाचे रस्ते, उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना गती देण्यासाठी मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा वर्षा या निवासस्थानी जाऊन मा. मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण , उड्डाणपूल तसेच रेल्वे ओव्हर ब्रीजचे प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वसईच्या आमदार म्हणून निवडून आल्यावर नागपूर येथील पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर या प्रश्नावर शासन आणि एम.एम.आर.डी. यांच्याबरोबर सातत्याने पत्रव्यवहार आणि बैठका आयोजित करून या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
याच अनुषंगाने आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी एम एम आर डी च्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा केली असता , महानगर पालिकेकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. यासाठी दि. २५/०९/२०२५ रोजी पुन्हा आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी एम.एम.आर.डी.ए. चे अधिकारी आणि महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी यांची महानगर पालिकेच्या मुख्यालयात संयुक्तिक बैठक घेऊन या प्रस्तावांच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करून त्याप्रमाणे आराखडे सुधारित करण्याच्या व परिपूर्ण प्रस्ताव २ दिवसात एम.एम.आर.डी.ए. कडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या सर्व प्रस्तावातील त्रुटी दूर करून महानगर पालिकेने दि. २६/०९/ २०२४ रोजीच एम.एम. आर .डी.ए. कडे सादर केले.
त्यानुसार या प्रस्तावांना त्वरीत मान्यता देण्यासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी दि. ३०/०९/२०२५ रोजी पुन्हा वर्षा या निवासस्थानी जाऊनमा. मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. व या प्रस्तावांना त्वरीत मान्यता देण्याची त्यांना विनंती केली.
मा. मुख्यमंत्री यांनी वसई तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक समस्या याकडे आपले लक्ष असून एम. एम. आर.डी. ए. च्या प्रस्तावांना त्वरेने मान्यता देण्यात येईल असे सांगितले.
*आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित जनसंपर्क कार्यालय वसई पश्चिम.*