*पालघर आणि वसई पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे चक्रानुक्रमे आरक्षण सोडत काढण्यात येणार*
पालघर, दि. २८ सप्टेंबर : महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक ३१७, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण व निवडणूक नियम १९६२ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर 2025 रोजी आधी सूचना प्रसिद्ध केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या जिपनि-२०२५/प्र.क्र.१२ज/पंरा-२, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ या अधिसूचनेनुसार, पालघर जिल्ह्यातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सहा पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे वाचन
त्याचबरोबर अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः न येणाऱ्या पालघर आणि वसई या दोन पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण चक्रानुक्रमे निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता काढण्यात येणार आहे . ही सोडत लोकशाहीर आत्माराम पाटील ,जिल्हा नियोजन समिती सभागृह, कक्ष क्र. २१५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे होणार आहे.
जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आरक्षण सोडत सभेत उपस्थित राहण्याची इच्छा असेल त्यांनी वरील नमूद ठिकाणी नियोजित दिवशी आणि वेळेत उपस्थित राहावे
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
---