डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचाव कार्य यशस्वी १६ महिला व बस चालक सुखरूप बाहेर - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Sunday, 28 September 2025

डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचाव कार्य यशस्वी १६ महिला व बस चालक सुखरूप बाहेर

 *डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य यशस्वी*


*१६ महिला व बसचालक सुखरूप बाहेर* 



पालघर, दि. २८ सप्टेंबर : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यात हाती घेण्यात आलेले बचावकार्य यशस्वी ठरले. अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळील रस्त्यावर अडकलेल्या बसमधून १६ महिला आणि बसचालकासह एकूण १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.


 हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच डहाणू परिसरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली. पाण्याच्या प्रवाहात बस अडकून मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. तात्काळ जिल्हा प्रशासनाने धाव घेतल्याामुळे सर्वजण सुरक्षित बाहेर आले.


*या बचावकार्यात डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले असून त्यांच्यावर डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय, येथे उपचार सुरू आहेत.*


बचावकार्या दरम्यान डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे , तहसीलदार सुनील कोळी,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन पगारे,नगरपालिका कर्मचारी,  तसेच विविध यंत्रणांचे सहकार्य लाभले.


बचाव करण्यात आलेल्या सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत. वेळेत हाती घेतलेले प्रशासनाचे प्रयत्न आणि जिल्हा यंत्रणांची समन्वयात्मक कामगिरीमुळे  दुर्घटना टळली.



---