*“श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमेअंतर्गत* *मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन*
पालघर:11 सप्टेंबर : पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यातर्फे “श्री गणेशा आरोग्याचा” या विशेष आरोग्य मोहिमेअंतर्गत एकूण 342 आरोग्य शिबिरे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. सदर मोहिमेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सहज व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे तसेच आरोग्याबाबत जनजागृती करणे हा होता.
या शिबिरांचे तपशील पुढीलप्रमाणे :
• एकूण शिबिरे आयोजित – 342
• एकूण रुग्णांची तपासणी – 19,913
• पुरुष रुग्ण – 8,813
• महिला रुग्ण – 6,897
• बालरुग्ण – 4,206
• रेफर करण्यात आलेले रुग्ण – 215
• रक्तदान शिबिरे आयोजित – 04
• एकूण रक्त पिशव्या संकलन – 184
विशेष तपासण्या व सेवा :
• एक्स-रे तपासणी – 73
• ईसीजी तपासणी – 524
• सिकल सेल स्क्रिनिंग – 1,474
• आयुष्मान भारत कार्ड तयार – 1,089
या उपक्रमातून हजारो नागरिकांना थेट आरोग्यसेवेचा लाभ झाला. गंभीर रुग्णांना आवश्यक तेथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. रक्तदान शिबिरांमधून संकलित झालेल्या रक्तपिशव्यांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदायी मदत मिळणार आहे.
सदर मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिक यांचे सहकार्य लाभले असून मुख्यमंत्री सहायता निधी, पालघर तर्फे सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.
“सर्व नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा पुरविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा आरोग्यसेवेचा स्तर अधिक उंचावण्याचा प्रयत्न सतत सुरू राहील.”