डहाणू अन्नपुरवठा अधिकारी विरोधात लाल बावटा पक्षाचे आंदोलन ठरले निर्णायक*
*आदिवासी समाजाच्या रेशनकार्ड प्रश्नावर ठणकावून लढा – शिधापत्रिका साठी उत्पन्न दाखल्याची अट शिथिल केल्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित*
डहाणू :
डहाणू अन्नपुरवठा अधिकारी यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करत माक्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी डहाणू अन्नपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले.
या आंदोलनाची सुरवात दुपारी 12 वाजता पारनाका येथुन झाली पार नाका येथून मोर्चा काढुन जोरदार घोषणा देत तहसीलदार कार्यालयावर चाल केली. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा येताच पोलिसांनी कार्यालयाचा मुख्य द्वार बंद करून घेतला.
आंदोलनकर्तेने आक्रमक भूमिका घेत.आम्ही देशाचे मालक हाव. ते तहसीलदार तालुक्याचे चालक आहेत. आम्ही मालक असुन सुद्धा बाहेर का थांबायचे. आम्ही भरलेल्या ट्राक्स मधुन तुम्हाला पगार मिळतो. असे ठणकावून सांगत. पोलिसांशी संघर्ष करत बंद केलेले मुख्य द्वार ढकलून आत शिरकाव केला.
मोर्चे कर्यांची संख्या हजारोंच्या संख्येने असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी झालेला हा प्रखर लढा सर्वांच्या नजरेत भरला आहे. ह्या अनोखे आणी निर्णायक आंदोलनाची चर्चा जिल्हा भरात सुरू झाली आहे.
पक्षाचे जिल्हा सह सचिव काॅम्रेड शेरु वाघ ह्यांनी आंदोलनादरम्यान दिलेल्या प्रतीक्रिया.
आदिवासी समाजाच्या रेशनकार्ड प्रकरणात अधिकारी जाचक अटी लादत होते. गेल्या वर्षभरापासून शेकडो आदिवासी कुटुंबांची रेशनकार्ड प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली होती. तसेच, ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची व तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्न दाखला काढून तो शिधापत्रिका साठी सादर करण्याचे सक्ती करून गरीब आदिवासींना उघडपणे त्रास दिला जात होता. म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागले.
ठिय्या आंदोलनादरम्यान आंदोलन कर्त्याने थेट पुरवठा अधिकारी चे दालणात तब्बल तिन तास ठिया दिला, जोरदार घोषणाने परिसर दणाणून सोडले होते. ढोलकिच्या तालावर पारंपरिक आदिवासी गीत व चळवळीची गाणी गात महिलांनी दालणात ठेका धरला.
यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या कामचुकार वृत्तीवर गाणी गाऊन त्यांना खडेबोल सुनावण्यात आले. "अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही" असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. अखेर ह्या आंदोलनाची दखल तहसीलदार सुनील कोळी ह्यांनी घेतली व शिष्टमंडळाने चर्चा करुन प्रलंबित शिधापत्रिका तातडीने वाटप केले, वर्ष भरापुर्वी मुक्त केलेले आदिवासी वेठ बिगारांना "वेठ बिगार मुक्ती चे प्रमाण पत्र दिले"
नवीन शिधापत्रिका साठी आज पासून उत्पन्न दाखल्याची अट शिथिल केले असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
डहाणूत झालेलं हे आंदोलन आदिवासी समाजाच्या हक्कासाठी झालेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचं ज्वलंत उदाहरण ठरलं असून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारं ठरलं आहे.