सार्थ जीवन जगणार आदर्श व्यक्तिमत्व,रामचंद्र केळवेकर
- संदेश जाधव
रामचंद्र केरोबा केळवेकर यांचा ९०वा वाढदिवस समारंभ संपन्न
पालघर तालुक्यातील अथांग समुद्रकिनारा लगत निसर्गरम्य परिसर लाभलेल एडवण गांव येथे शिवशंकर ,श्री राम, श्री अशापुरा देवी ही पुरातन मंदिरे आणि येथे विविध जाती धर्माचे नागरिक आपल वास्तव्य करून पारंपरिक व्यवसाय करीत आहेत ,
याच एडवण गांवात ५ सप्टेंबर १९३५ रोजी रामचंद्र केरोबा केळवेकर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण ,व्यवसाय शेती ,शिपाई ,शिक्षक ,उपमुख्याध्यापक ते मुख्याध्यापक पदावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले ते आदर्श शिक्षक व संत रोहिदास पुरस्काराने ते सन्मानित आहेत.शिक्षण प्रेमी,नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र केळवेकरांचा प्लॅटिनियम ९० वा वाढदिवस शहाजीराजे क्रीडा संकुलात कौटुंबिक व ज्येष्ठनागरिक संघ यांचे उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर , संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव ,उपाध्यक्ष संदिप राऊत, पालघर तालुका रोहिदास समाजचे अध्यक्ष सुभाष पाटील , आरटीओ मेजर शिरीषकर साहेब,चंद्रकांत उसनकर , डॅा. विजय केळवेकर , राजन वनमाळी उपस्थित होते.सूत्रसंचालन केळवेकरांची नात व लोकमत सखी ची गार्गी गोरेगावकर तर लहानशा नात स्वानंदी हिने स्वागत गीत सादर केले,आभार प्रदर्शन योगेश केळवेकर यांनी केले.संदेश जाधव यांनी गुरुजींच्या कार्याचा व गावाच्या इतिहास सांगून आठवणींना उजाळा दिला.