एक दिवसीय पेन्शन अदालतीची 25 सप्टेंबर रोजी आयोजन - Vasai live Marathi news
📢 यह टेक्स्ट केवल Admin द्वारा संपादित किया जा सकता है।
📢 Breaking News: यहाँ Admin जो चाहे लिख सकता है — बाकी कोई नहीं बदल सकता।
📢 यहाँ पर अपना मैसेज लिखें — Breaking News, Event, या Announcement!
🔄 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...
🔴 Vasai Live News - अब सच्‍ची खबरें मिलेंगी आपकी अपनी वेबसाइट और YouTube चैनल पर! जुड़े रहिए सच्चाई के साथ! 🔴
✨ वसई लाईव्ह न्यूज संपर्क क्रमांक 9890188174✨

Friday, 19 September 2025

एक दिवसीय पेन्शन अदालतीची 25 सप्टेंबर रोजी आयोजन

 


*एकदिवसीय पेन्शन अदालतीचे २५ सप्टेंबर रोजी आयोजन* 


पालघर दिनांक १९ : भारतीय लेखापरिक्षा व लेखा विभाग, महालेखाकार, कार्यालय-१ महाराष्ट्र आणि संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच जिल्हा कोषागार कार्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय पेन्शन अदालत ,कार्यशाळा,  गुरुवार  दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, कक्ष क्र. १०३. जिल्हा प्रशासकीय मुख्यालय, प्रशासकीय इमारत - ब ,पालघर-बोईसर रस्ता, कोळगाव,  पालघर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सकाळी १०.०० वा. ते दु. १.०० पर्यंत केवळ राज्य शासकीय कार्यालयातील निवृत्तीवेतन संबंधी कामकाज पाहणा-या कर्मचारी यांनी तसेच दुपारी २.३० ते ४.३० वा. निवृत्तीवेतन संघटना / सदस्य यांनी वरील नमूद स्थळी उपस्थित रहावे. सदर कार्यशाळेमध्ये सेवानिवृत्ती प्रकरणांवर मार्गदर्शन व चर्चा आयोजीत करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संदेश सुर्वे यांनी  केले.