वसई-विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग
दि.05/09/2025
*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त*
मा.राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट, २०२५ रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगरपालीकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये (प्रभाग - ए, बी, सी, डी, ई, एच, जी, एच, आय) तसेच महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
सदर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करणेसाठी दि.२२ ऑगस्ट, २०२५ ते दि.०४ सप्टेंबर, २०२५ हा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगरपालीकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकूण *१६० हरकती व सूचना* प्राप्त झाल्या आहेत. सदर प्राप्त हरकती मध्ये १० मूळ हरकतींसोबत त्याच स्वरूपाचे २१३० रहिवाशांनी सामुहिकरित्या दाखल केलेल्या एका हरकतीचा समावेश आहे. सदर हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना घेतलेल्या हरकतींवर सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये महानगरपालिकेमार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.