*प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवरील सुनावणी संपन्न*
मा.राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 करिता प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना दि.22 ऑगस्ट, 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करणेसाठी दि.22 ऑगस्ट, 2025 ते दि.04 सप्टेंबर, 2025 हा कालावधी देण्यात आला होता. सदर कालावधीत 160 हरकती सुचना प्राप्त झालेल्या होत्या त्यावर दि.10 सप्टेंबर 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात सुनावणी घेण्यात आल्या.
सदर सुनावणीसाठी मा. नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडुन मा.डॉ.निपुण विनायक (भा.प्र.से.), सचिव, सार्वजनिक आरोग्य विकास मंत्रालय यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच या सुनावणीवेळी मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे हे उपस्थित होते.
आज दि.10 सप्टेंबर 2025 रोजी एकुण प्राप्त 160 हरकतदारांपैकी 154 हरकतदार उपस्थित होते. प्राप्त हरकती-सूचनांचे स्वरूप व हरकतदारांचे म्हणणे विचारात घेऊन मा.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांची पडताळणी करून अंतीम अभिप्रायाचा मसुदा मा.नगर विकास विभागास सादर करण्यात येणार आहे.
निवडणूक विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका